Kokan: पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

0
95
वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट; वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

कुडाळ – गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय-४८) हे बुधवारी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी त्यांच्या घरी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटूंबियांचे सांत्वन करत धीर दिला. राऊळ कुटुबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी यावेळी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लेखक-श्री-विलास-भि-कोळी-य/

जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन विचारपूस केली

कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करीत असताना महादेवाचे केरवडे येथील वायरमन धनंजय फाले यांना विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु आहेत. त्यांच्या घरी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन विचारपूस केली.

तसेच वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील रोहित स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे मालक रोहित बोवलेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद अकाली निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन बोवलेकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी शिवापूर येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, शिरी नेवगी, उपसरपंच महेंद्र राऊळ, सुधीर राऊळ,ग्रा. प. सदस्य राजाराम पालकर, सुरेश नाईक, सुरेश बोभाटे, विठ्ठल बेळणेकर,दीपक राऊळ, शरद राऊळ, शैलेश राऊळ, आनंद राऊळ, मंगेश कदम आदी.वेंगुर्ले येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, संपर्क प्रमुख बाळा चिपकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, सुनील बोवलेकर आदी उपस्थित होते.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here