Kokan: पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपाचा सरपंच तर वायंगणी ग्रामपंचायतीवर उबाठाचा सरपंच 

0
43
पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपाचा सरपंच
पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपाचा सरपंच

तर वायंगणी ग्रामपंचायतीवर उबाठाचा सरपंच 

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूकीत पेंडूर, मातोंड व खानोली ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत सरपंच, तर वायंगणी ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सरपंच निवडून आले. यामध्ये भाजपाचे संतोष गावडे (पेंडूर), मयुरी वडाचेपाटकर (मातोंड) व सुभाष खानोलकर (खानोली) तर उबाठाचे दत्ताराम दुतोंडकर (वायंगणी) यांचा समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विश्वनाथ-पंडित-यांना-आच/

 काल झालेल्या या निवडणूकांची मतमोजणी आज सकाळी तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला तहसिल कार्यालयात पार पडली. सकाळपासून उमेदवार, त्यांचे समर्थक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसिलदार कार्यालय परिसरात गर्दी केली.

संक्षिप्त निकाल – खानोली – सरपंच-सुभाष खानोलकर (२७५), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-प्रतिभा वरक (९८), अमिता खानोलकर (८४), सर्वसाधारण-सचिन परब (९९), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-बाळकृष्ण मेस्त्री (८६), रूपाली प्रभूखानोलकर (१०९), प्रभाग क्र.३-सर्वसाधारण स्त्री-साधना पवार (१००), सर्वसाधारण-सुनिल घाग (८८)

वायंगणी-सरपंच-दत्ताराम दुतोंडकर (५१५), सदस्य-प्रभाग क्र.१-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री-विद्या कांबळी (२५४), सर्वसाधारण स्त्री-दिपाली नांदोसकर (२०९), सर्वसाधारण-अनंत केळजी (३१४), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-महेश मुणनकर (२३५), सर्वसाधारण स्त्री-सविता परब (१९५), सर्वसाधारण-रविद्र धोंड (२६१), प्रभाग क्र. ३-सर्वसाधारण स्त्री-विद्या गोवेकर (२६६), राखी धोंड (२६३), सर्वसाधारण-अनंत मठकर (१९२)

 मातोंड-सरपंच-मयुरी वडाचेपाटकर (८१८), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-किशोरी परब (३३९), सुजाता सावंत (४३०), सर्वसाधारण-आनंद परब (३७३), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-विशाल बागायतकर (३१२), सर्वसाधारण स्त्री-वैभवी परब (३०९), सर्वसाधारण-दिपेश परब (३४३), प्रभाग क्र.३-अनुसुचित जाती जमाती स्त्री – किरण मातोंडकर (२३२),   आर्या रेडकर (बिनविरोध), सर्वसाधारण-राहूल प्रभू (१८१),

पेंडूर-सरपंच-संतोष गावडे (६७२), प्रभाग क्र. १ – सर्वसाधारण स्त्री – सुहासिनी वैद्य (१८९), रंजना हर्जी (१८४), सर्वसाधारण-निलेश वैद्य (१९४), प्रभाग क्र. २- नागरिकांचा मागास प्रवर्ग – समिक्षा तांडेल (२३१), सर्वसाधारण स्त्री-सुलोचना परब (२०२), सर्वसाधारण-महादेव नाईक (२५१), प्रभाग क्र. ३-नागरिकांचा मागास प्रवर्ग – दिपक कवठणकर (३३२), सर्वसाधारण स्त्री – प्रणिता सावंत (३१४), सर्वसाधारण – मिलिद गावडे (३४४)

निकाल जाहिर होताचक्षणी राजन तेली, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, समिर कुडाळकर, शरद मेस्त्री यांनी भाजपाच्या विजयी उमेदवारांचे तर यशवंत परब, संजय गावडे, अजित राऊळ यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

फोटोओळी – १) भाजपाच्या पदाधिका-यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. २) शिवसेनेच्या पदाधिका-यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here