वेंगुर्ला प्रतिनिधी- तुळस-खरीवाडा येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद बाबली परूळकर (४१) यांचे २४ मार्च रोजी निधन झाले. अलिकडेच त्यांची गवडेवंश देवस्थान पेडणे-गोव्याच्या सल्लागारपदी निवड झाली होती. अनेक समाजोपयोगी उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-उत्साहात-ह/
सिंधुदुर्ग जिल्हा युवा भंडारी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रसाद बाबली परुळकर यांचे अल्पशा आजाराने गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील रहिवासी प्रसाद परुळकर यांच्या निधनाने तुळस गावासह वेंगुर्लेसह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
वेंगुर्ले पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे भाऊ तर तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन परुळकर यांचे ते चुलत भाऊ होत. सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले हुशार आणि कर्तृत्ववान युवा व्यक्तिमत्व प्रसाद परुळकर हे वेंगुर्लेतील उद्योजक विलास गावडे यांचे ते विश्वासू सहकारी होते. प्रसाद परुळकर यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन विवाहित बहिणी,भावोजी, चुलत भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे.
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सचिन परूळकर आणि वेंगुर्ला पंचायत समितीच्या माजी सभापती अनुश्री कांबळी यांचे ते भाऊ होत.
फोटो – प्रसाद परूळकर