वेंगुर्ला – वेंगुर्ला शहरातील प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी त्वरित अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ला भाजपा शहर युवक तर्फे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे.शहराच्या
विकासासाठी व नागरिकांच्या सोईकरीता सुमारे 80 लाख रुपये खर्च करुन शहराचा सर्वे करण्यात आला आहे. परंतु अद्यापही भूमि अभिलेख कार्यालयाकडून पॉपर्टी कार्ड मिळाले नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ले-शहराला-विविध-व/
यामुळे विविध राजकीय व केंद्र शासनाच्या योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घर सुमारे 200 वर्षापासून नावावर असून सुद्धा निव्वळ सातबारावर मालक म्हणून नोंद नसल्याने या योजनेच्या अनुदानापासून तसेच जुने घर पाडून नविन बांधणे, नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडे तारण म्हणून ठेवणे अडचणीचे होत आहे.तरी याबाबत चौकशी करुन ही प्रक्रिया मार्गी लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, पालकमंत्री चव्हाण यांनी या निवेदनाची दखल घेऊन उचित कार्यवाहीसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.


