Kokan: फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक

0
72
फसवणूक करणाऱ्या बिल्डरला अटक
तालुक्यातील नेवरे- सोहमनगर येथील रो-हाऊस स्वस्तात विकत घेऊन देतो सांगून ५१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला जयगड पोलिसांनी अटक केली . न्यायालयाने आरोपी बिल्डर सतीश प्रभाकर आगाशे याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

रत्नागिरी- तालुक्यातील नेवरे- सोहमनगर येथील रो-हाऊस स्वस्तात विकत घेऊन देतो सांगून ५१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला जयगड पोलिसांनी अटक केली . न्यायालयाने आरोपी बिल्डर सतीश प्रभाकर आगाशे याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरीत-इ-स-पूर्व-४०-ह/

गणपतीपुळे येथील मिलिंद चिंतामण दाते यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली . रत्नागिरी तालुक्यातील नेवरे सोहमनगर येथे प्रशांत रणपिसे यांच्या मालकीचा रो – हाऊस विकणार की नाही याची कोणतीही माहिती नसताना आरोपी बिल्डरने तो रो-हाऊस विकायचे आहे असे मिलिंद दाते यांना भासवण्यात आले . ही मालमत्ता स्वस्तात मिळवून देतो असे आरोपीने आमिष दाखवल्याने एका कंपनीतून निवृत्त झालेले मिलिंद दाते यांना विश्वासात घेतले . या संदर्भात व्यवहार ठरवण्यासाठी गणपतीपुळ्यातील एका हॉटेलमध्ये जून २०२१ ते ऑगस्ट २०२३ या मुदतीत बैठका झाल्या . यातून ५१ लाख रुपयांचा व्यवहार ठरल्यानंतर आरोपी बिल्डरला फिर्यादीने ५१ लाख रुपये दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे . आरोपी बिल्डर पाठपुरावा करूनही घेतलेली रक्कम परत देत नसल्याचे पाहून २० ऑगस्ट २०२३ रोजी दाते यांनी जयगड पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आगाशे पोलिसांना मिळून येत नव्हते . आरोपी मूळचा वारजे पुण्याचा असून , ते गणपतीपुळ्याला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली . त्यानुसार तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी पाळत ठेवून पकडले . शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले . न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत . पोलिसांतर्फे विशेष सहायक सरकारी वकील नाचणकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here