Kokan: बांदा ह्वी.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक क्रिडामेळावा उत्साहात साजरा

0
8
वार्षिक क्रिडामेळावा उत्साहात साजरा,
ह्वी.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक क्रिडामेळावा उत्साहात साजरा

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सुनिता भाईप l सावंतवाडी-

बांदा येथील ह्वी.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे,वार्षिक क्रिडामेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून, उद्योजक व समाज सेवक ,एस.एस.पी.एम.गोवा चे व्हाइस प्रेसिडेंट व फाउंडर मेंबर श्री. कुमार विध्वंस सर उपस्थित होते. वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस.एस.पी.एम.गोवाचे जनरल सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये, विशेष अतिथी म्हणून बांदा गावच्या प्रथम नागरिक प्रियांका नाईक, तसेच जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंच सदस्या रेश्मा सावंतही यावेळी उपस्थित होत्या तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्यध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, सहशिक्षिका रसिका वाटवेही उपस्थित होत्या.https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-नाका-येथे-सायबर-स/

मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या शिक्षिका रसिका वाटवे यांनी पाहूण्यांची ओळख करून दिली. तदनंतर मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर सरपंच प्रियांका नाईक यांनी खेळामुळे शारीरिक विकास तर होतोच पण मानसिक विकास व परिणामी सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला .यानंतर क्रीडाझेंडा फडकवून नंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून संपूर्ण मैदानावर ती क्रीडामशाल फिरविण्यात आली. शाळेची हेडगर्ल कु.श्रीशा सावंत हिने क्रिडाशपथ घेतली. शाळेचा हेडबॉय कु.गोविंद गावकर याने क्रीडा मशाल घेतली. नंतर मार्चपास्ट घेण्यात आले. शाळेचा हेडबॉय , त्यामागे हेडगर्ल कु.श्रीशा सावंत हिच्यामागे रेड हाऊसचे प्रमुख कु.सान्वी राऊळ व कु संस्कार शिरोडकर,ग्रीनहाउसचे प्रमुख कु.मयंका वेंगुर्लेकर व कु. अमृत पेंडूरकर,येल्लो हाऊसचे कु. मितेश मयेकर व कु.दुर्वा वारंग तर ब्लू हाऊसचे कु.रिदा शेख व कु.सुयश गावकर यांनी ती मशाल मैदानावर फिरविली.

यानंतर कॉलेस्थेनिक प्रदर्शन घेण्यात आले. सर्वांत प्रथम, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी योगा डान्स नंतर इयत्ता सहावीच्या वर्गाने एरोबिक्स एक्सरसाइज ड्रील व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी झुम्बा डान्स व आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थीनींनी लेझीम नृत्य व आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक सुदृढता दाखवत पिरामिड व विविध प्रकार सादर केले. या दोन दिवसीय क्रीडा मेळाव्यात बेडूक उड्या,बाॅल बादलीत टाकणे ,१०० मी, २०० मी व ४०० मी धावणे, गोळा फेक ,थाळीफेक, व्हॉलिबॉल, कबड्डी, लिंबू चमचा,फूटबाॅल, ५०X४ रिले ,लांब उडी, उंच उडी ,डॉजबाॅल व रस्सीखेच हे विद्यार्थ्यांसाठी खेळ घेण्यात आले.

क्रीडा मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्यातील होंडा सत्तरी येथील होंडा स्कूलचे हेडमास्तर श्री अभिजीत पेडणेकर सर जे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी श्री. त्रिविक्रम उपाध्ये सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई तसेच उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर व शिक्षिका रसिका वाटवे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच पालकही उपस्थित होते यावेळी पेडणेकर सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की खेळात हरणं किंवा जिंकणं हे आलंच पण ते हार किंवा जी ह्या दोन्ही गोष्टी खेळाडू वृत्तीने घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवून आपला शारीरिक मानसिक विकास घडवून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

संपूर्ण शिक्षकवृंदाने हा क्रीडामेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे आभार क्रीडा शिक्षक श्री.भुषण सावंत व सुत्रसंचालन शिक्षिका स्नेहा नाईक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here