Kokan: बागायतदारांनी अनुदानीत कामगंध सापळे व ल्युर्सचा फायदा घ्यावा

0
94
फळमाशी,सिधुरत्न समृद्ध योजना,
बागायतदारांनी अनुदानीत कामगंध सापळे व ल्युर्सचा फायदा घ्यावा

वेंगुर्ला प्रतिनिधी– फळमाशीपासून आंबा पिकाचे संरक्षण होण्यासाठी सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत अर्ज केल्यास कामगंध सापळे व ल्युर्स प्राप्त होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा बागायतदारांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा आंबा, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केले आहे.

गेल्या ३ ते ४ वर्षात फळमाशीचा प्रादूर्भाव वाढल्याने आंबा फळ मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे प्रत्येक आंबा बागेत कामगंध सापळे व ल्युर्स लावणे आवश्यक बनले आहे. यासाठी सिधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघ तसेच विविध आंबा संस्थांनी सातत्याने केलेली मागणी विचारात घेऊन सिधुदुर्ग समृद्ध योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर शासनस्तवरावर सापळे मिळण्याची योजना कार्यान्वित होत आहे. आंबा उत्पादक शेतक-यांनी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे कामगंध सापळे व ल्युर्सची मागणी केल्यास ती त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे शेतक-यांनी ७/१२, ८ अ व आधार कार्डाच्या प्रतीसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जयप्रकाश चमणकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here