⭐कृषी बाजार समितीचे तुळशीदास रावराणे यांचे आवाहन
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घेऊनच काजू-बी खरेदी करावी आणि शेतकऱ्यांनी पावती घेऊनच काजू-बीची विक्री करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे. रितसर परवाना घेऊन काजू-बी खरेदी केल्यास व काजू-बी विक्री करताना रितसर पावती घेतल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानाचा लाभ घेता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-महाराष्ट्र-प्रदेश-काँग्/
२०२५-२६ च्या वर्षाचा काजू हंगाम सुरू झाला असून काजू-बीला चांगला दर मिळण्याच्या दृष्टिकोनातून बाजार समिती प्रयत्नशील आहे. सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर काजू बी विक्री करताना जिल्ह्यातील व्यापारी, अडते, प्रक्रियादार यांना काजू बी विक्री करताना त्यांच्याजवळ बाजार समितीचे व्यापारी व प्रक्रियादार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना व शासनाचे अधिकच्या नियमानुसार जो व्यापारी आपल्याकडून खरेदी करणार आहे, त्यांच्याकडून रितसर पावती घेऊन काजू विक्री करणे आवश्यक आहे. कारण काजू हंगामात शासनाकडून
अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीचे अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करणे गरजेचे आहे. शासन अनुदानासाठी अनाधिकृत व्यापाऱ्यांसोबत व्यवहार वैध धरले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.तसेच जिल्हयातील काजू व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी खरेदी, विक्री, विकास व विनियमन व अधिनियम १९६३ व नियम १९६७ चे कलम ७ प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घेऊन काजू बी खरेदी करायची आहे. जो व्यापारी विनापरवाना खरेदी करीत असेल, त्याच्यावर बाजार समितीच्या कलम ६४ अन्वये सहा महिने मुदतीपर्यंत कैदेची शिक्षा किंवा पाच हजार रुपयेपर्यंत दंडाची शिक्षा होईल, याची नोंद खरेदीदारांनी घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे