वेंगुर्ले / प्रतिनिधी- : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मीक बालविकास सेवा योजना क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन २०२३/२४ करीता आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले. पर्यवेक्षिका तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून वेंगुर्ले येथील शर्मिष्ठा सामंत यांना आणि मिनी अंगणवाडी सेविका म्हणून रेडी बीट च्या श्रेया एकनाथ कुडव यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-दापोलीतील-साई-रिसॉर्ट-पा/
सिंधूनगरी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांच्यासह जिल्हा वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी परुळेबाजार आदर्श अंगणवाडी सेविका ऋतुजा लक्ष्मण राऊळ व आदर्श मदतनीस राजश्री परुळेकर यांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.