Kokan: बीएसएनएल टॉवरच्या मागणीचा पुरावा सादर करा – बाळू परब यांचे जाहीर आव्हान

0
42
बीएसएनएल टॉवरच्या मागणीचा पुरावा सादर करा - बाळू परब यांचे जाहीर आव्हान
बीएसएनएल टॉवरच्या मागणीचा पुरावा सादर करा - बाळू परब यांचे जाहीर आव्हान

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून २३ बीएसएनएलचे टॉवर मंजूर झाले असून ८ डिसेंबर रोजी खासदारांच्या हस्ते बीएसएनएलचे अधिकारी ठेकेदार व गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार हे भाजप राणे समर्थक यांना समजल्यावर त्यांनी स्वतःचाच उदो उदो करून घेण्यासाठी नारळ फोडत गेले. टॉवर मंजुरीसाठी कुठलाही पत्रव्यवहार न करता किवा संसदेत एक चकार शब्दही न काढता नारायण राणे यांनी टॉवरला मंजुरी दिली असे भासवण्याचं काम भाजप राणे समर्थक करत असून त्यांची आयत्या बिळावरची व दुस-याच्या ताटातल उष्ट खायची सवय पडून गेलेली आहे. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, नारायण राणेंनी केलेल्या एकातरी टॉवरच्या मागणीचा पुरावा सादर करावा अशी प्रतिक्रिया वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-लोकअदालतीमध्/

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वेंगुर्ला तालुक्यातील चीपी, कर्लीवाडी परुळेबाजार, कुषेवाडा व्राथमिक आरोग्य केंद्र, मेढा श्रीरामवाडी, वायंगणी-हरचिरणगिरी, दाभोली, खानोली, वेतोरे, मोचेमाड, सागरतिर्थ, टाक, शिरोडा-केरवाडा या गावातील टॉवरचे भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पुढील आठवड्यात उर्वरित गावातील टॉवरचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी बीएसएनएलचे अधिकारी शशांक श्रीवास्तव, ठेकेदार भरत,  जिल्ह्याचे संफप्रमुख अरुणभाई दूधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, सावंतवाडी विधानसभा संफप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुकाप्रमुख बाळू परब, तालुका संफप्रमुख भालचंद्र चिपकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, उपविभाग प्रमुख निलेश परुळेकर आदी पदाधिकारी व त्या त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 आमचे खासदार राऊत यांनी गावातील लोकांच्या मागणीनुसार वेळोवेळी संसदेत टॉवर मंजुरीसाठी मागणी केली तसेच संबंधित मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून तालुक्यात जवळपास २३ टॉवर मंजूर करून घेतले. त्यामुळे याचे सर्वस्वी श्रेय खासदार राऊत यांनाच असल्याचे परब यांनी सांगितले.

फोटो – यशवंत परब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here