Kokan: भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाची भाजपच्याच सरपंचाने आ. वैभव नाईक आणि कार्यकारी अभियंत्यांकडे केली तक्रार

0
63
चिंदर रस्ता काम
भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने केलेल्या चिंदर रस्त्याच्या कामाची भाजपच्याच सरपंचाने आ. वैभव नाईक आणि कार्यकारी अभियंत्यांकडे केली तक्रार

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

चिंदर : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत चिंदर भटवाडी ते पालकरवाडी लब्देवाडी भगवंतगड रस्ता मंजूर करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम भाजपच्याच स्वयंघोषित नेत्याने घेतले असून गेली ३ ते ४ वर्षे ते काम सुरु आहे. सदर रस्त्याचे काम सुरु असतानाच रस्त्याची साईडपट्टी खराब झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रस्त्याचे कोटींगही खराब झालेले आहे. रस्त्याच्या बाजूचे नीस व्यवस्थित लावलेले नाहीत. सदर रस्ता सुस्थितीत करण्याची विनंती भाजप पक्षाच्या चिंदर गावच्या सरपंचांनी त्या स्वयंघोषीत भाजप नेत्याकडे केली. मात्र भाजपच्या स्वयंघोषित नेत्याने ती मागणी धुडकावल्याने खुद्द भाजप पक्षाच्याच चिंदर सरपंचांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-घावनळेत-३-कोटी-५४-लाख-आणि/

सा.बा. विभागामार्फत सदर रस्त्याची पाहणी करून रस्त्यावर डांबराने कोटींग व साईटपट्टी नव्याने करावी. तसेच निस व्यवस्थित लावून लावावेत अशी विनंती चिंदर सरपंचांनी तक्रार अर्जात केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी देखील याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांकडे सदर रस्त्याच्या कामाची चौकशी लावून कारवाई करण्याचा पत्रव्यवहार केला आहे.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here