केसरी फणसेवाडी येथे सुरू होणार के एस आर ग्लोबल ॲक्वेरिअम:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
कुडाळ ता.०९-: भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-पी-एम-किसान-योजनेच्या-प्/