खेड (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्ग वरील भोस्ते घाटात आयशर टेम्पो कंटेनर चा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली या अपघात तिघे जण गंभीर रित्या जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे या अपघाता मुळे महामार्गा वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .https://sindhudurgsamachar.in/kokan-कोंडगे-लघु-पाटबंधारे-योज/
मुंबई हुन गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या कंटेंनर ने आयशर टेम्पो ला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पो कठडा तोडून खाली कोसळला तर कंटेनर रस्त्याच्या बाजूला कलंडला या अपघातमध्ये तिघेजण अडकून पडले होते
अपघाताची खबर मिळताच खेड पोलीस व मदत गृप चे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करत होते अपघात स्थळी क्रेन ला पाचारण करण्यात आले होते सांयकाळी उशीरा पर्यत दोन्ही ट्रक क्रेन च्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे