वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘महाफिड‘ स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रा.लि.पुणे यांच्यातर्फे वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला संगणक व प्रिटर मशिनचे वितरण करण्यात आले.
‘महाफिड‘तर्फे बनविण्यात येणारी खते बागबगीच्यांसाठी वापरण्यात येतात. जी महाविद्यालये या ‘महाफिड‘च्या खतांचा वापर करतात त्यांना कंपनीच्या व्यावसायीक व सामाजिक जबाबदारी फंडातून मदर करण्यात येते. कंपनीचे मॅनेजिग डायरेक्टर प्रविण पार्टील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे ही कंपनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहकार्य करीत आहे. कंपनीचे सांगली, कोल्हापूर, कोकण विभागाचे क्षेत्रीय मॅनेजर तानाजी पवार, वेंगुर्ला येथील श्री समर्थ एंटरप्रायझेसचे संचालक अच्युत प्रभूखानोलकर व आदिती प्रभूखानोलकर, सेल्स एक्झिक्युटीव्ह सचिन देशमुख, प्रॉडक्ट डेव्हल्पमेंट ऑफिसर समर्थ मते, सागर सागवेकर, सिधुदुर्ग आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते संगणक व प्रिटर प्रदान करण्यात आले. यावेळी अॅड.प्रकाश बोवलेकर, राजेंद्र आरमारकर, शिवराम आरोलकर, अनंत वायंगणकर, कृषी सहाय्यक लाडू जाधव, प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, प्रा.ए.के.बिराजदार, प्रा.एस.एस.कोंडेकर, प्रा.धनश्री पाटील, डॉ.बी.जी.गायकवाड आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-मोऱ्या-२२-मार्च/
फोटोओळी – महाफिडतर्फे खर्डेकर कॉलेजला संगणक व प्रिटर देण्यात आले.