Kokan: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम- तालुकाध्यक्ष: मिलिंद सावंत

0
35
राज ठाकरे ,वाढदिवस,
राज ठाकरे यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम

सुनिता भाईप/ सावंतवाडी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस श्री. संदीप दळवी व मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस श्री. गजानन राणे आणि सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. महेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यात तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी इन्सुली डोबाशेळ येथील फ्रान्सिस स्कॅन मिशनरीज ऑफ द क्रिस्त द किंग अपंग मूकबधिर मुली महिला वस्तीगृहात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५६ वा वाढदिवस मूकबधिर मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokanगोव्याहुन-गोवा-बनावटीच्/

यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मनसेच्या वतीने नवीन कपडे, खाऊ व खेळणी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या श्रीम. ब्रिजट वार्घेस यांनी मनसेचे राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभू दे. आमच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण मनसेच्या वर्धापन दिनाला या ठिकाणी येऊन जो आम्हांला विद्यार्थी संस्थेला शब्द दिला होता. की तुमच्या अजून काही मागण्या असतील ते आम्हाला सांगा त्याप्रमाणे आपण आज आमच्या वसतिगृहातील विद्यार्थीनीं मागण्या पूर्ण केलात त्याबद्दल मनसेचे आम्ही सर्व प्रथम आभार मानतो. यावेळी संस्थेच्या ॲटोनीती लोपस, पेन्डि्टा वाझ, व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच सावंतवाडी तालुक्यात निगुडेतील तीन अंगणवाडील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी निगुडे अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत,नुतन निगुडकर,मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाठ,साक्षी गावडे उपस्थित होती. इन्सुली अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे बांद्यामध्ये श्री. देव बांदेश्वर चरणी वाढदिवसानिमित्त अभिषेक करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, मळगाव पंचायत समिती विभागअध्यक्ष राकेश परब,इन्सुली शाखाअध्यक्ष दिनेश मुळीक तसेच शतायु जांभळे, साहिल तळकटकर, विशाल राऊळ, विजय बांदेकर, दिनेश शेर्लेकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here