प्रवेश शुल्क हे कमी आकारण्याची मागणी – युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
कुडाळ ता.२६-: महाराष्ट्र राज्य महसूल विभागा अंतर्गत तलाठी (वर्ग क) संवर्गातील ३६ जिल्ह्यात एकूण ४६४४ पदांसाठी सरळसेवा भरती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १४३ जागांसाठी ही भरती प्रकिया होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-जीवित-हानी-झाल्यास-संबंध/
सदर परीक्षेचे प्रवेशशुल्क हे खुल्या गटासाठी १००० आणि राखीव प्रवर्गासाठी ९०० एवढी आकारली आहे. ही परीक्षा घेवून सरकार विद्यार्थ्यांवर उपकार तर नाही ना करत ? ज्यांचे आई- वडील शेती, मोलमजुरी करतात त्यांचे काय? सध्याची बेरोजगारी पाहता कमीत कमी या परीक्षेला ९० हजाराच्या वर फॉर्म भरले जातील. यातून लाखो रुपये भेटतील. त्यामुळे युवासेनेच्या माध्यमातून सदर प्रवेश शुल्क हे कमी आकारण्यात यावे यासाठी प्रांताधिकारी ऐश्वर्या कोळशे यांना युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर, युवासेना माणगाव विभागप्रमुख रुपेश धारगळकर, युवासेना पावशी विभागप्रमुख मनीष तोटकेकर, युवासेना वर्दे शाखाप्रमुख संतोष सावंत, युवासेना घावनळेचे कोकरे, युवासेना कार्यकर्ते अविनाश नारकर आदी इत्यादी उपस्थित होते.

