Kokan: महिलांनी योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नत्ती साधावी – वालावलकर

0
77
हळदी कुंकू समारंभ,
शिरोडा येथे शिवसेना महिला आघाडी मार्फत आयोजित हळदी कुंकू समारंभाचे उद्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले.

वेंगुर्ला प्रतिनिधी– भविष्यात शिरोडा, रेडी मतदार संघात अनेक प्रकल्प आहेत. या ठिकाणचे प्रत्येक कुटुंब सुखी होईल यासाठी केसरकर यांचे प्रयत्न आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी विशेष योजना आणल्या आहेत. यामुळे महिलांनी या योजनांच्या माध्यमातून आपल्या बचत गटाच्या साहाय्याने आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी शिरोडा येथे केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-आनंदयात्रीच्या-श्राव/

वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना रेडी जिल्हा परिषद मतदार संघ महिला आघाडी यांच्यावतीने शिरोडा येथील श्री देवी माऊली सभागृहात हळदीकुंकू कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, सुनील सातजी, माजी उपसरपंच रवी पेडणेकर, काशिनाथ नार्वेकर, अमित गावडे, ग्रा.पं. सदस्य प्रथमेश बांदेकर, तात्या हाडये, मितेश परब, परेश मुळीक आदी उपस्थित होते. या समारंभाला शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीता कविटकर, सावंतवाडी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. महिलांनी शिव उद्योग योजनेचाही फायदा घ्यावा असे आवाहन सरपंच यशश्री सौदागर यांनी केले.

मान्यवरांचे स्वागत महिला आघाडी पदाधिकारी पाची नाईक, शीतल साळगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षा परब यांनी केले. या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या.

फोटोओळी – शिरोडा येथे शिवसेना महिला आघाडी मार्फत आयोजित हळदी कुंकू समारंभाचे उद्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here