आ. वैभव नाईक यांच्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सूचना
प्रतिनिधी पांडुशेठ साठम
मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केटसाठी २ कोटी , फायर स्टेशनसाठी २ कोटी व मामा वरेरकर नाट्यगृहाच्या हॉलच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रु निधी गेल्या ३ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सदर कामे धीम्या गतीने सुरु असून, पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आ. वैभव नाईक यांनी रविवारी या तिनही कामांच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करत मार्च महिन्यापर्यंत तीनही कामे पूर्ण करण्याच्या सक्त सूचना मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिल्या आहेत. अन्यथा नगरविकास विभागाच्या सचिवांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-भाजपा-च्या-वतीने-सुशासन/
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,शहर प्रमुख बाबी जोगी, महेश जावकर, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे, तपस्वी मयेकर, भाई कासवकर,सिद्धेश मांजरेकर,उमेश मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.