Kokan: मालवणात बंदर विभागाची बेधडक कारवाई , २४ तासात नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम पाडले

0
46
नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम पाडले
नोटीस बजावत मालवण किनारपट्टीवरील बांधकाम पाडले

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी व्यक्त केल्या संतप्त भावना
⭐सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढा लढणार असल्याचे केले स्पष्ट – –
मालवण- मालवण बंदर विभाग कार्यालय समोर परिसरातील जागेत गेले अनेक वर्षे असेलेले पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर राहत असलेले घर तसेच मोरेश्वर स्कुबा डायव्हींग सेंटरचे ऑफिस बुधवारी बंदर विभागाने धडक कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल

जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई येथे लढा सुरू असलेल्या या बांधकामावर आज अखेर बांधकाम विभागाने हातोडा चालविला. कडक पोलीस बंदोबस्त, बंदर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज याच्या साथीने सुमारे दोन तास चाललेल्या कारवाईत पूर्णपणे बांधकाम हटविण्यात आले. बांधकाम हटविताना त्याठिकाणी असलेली तीन झाडेही पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. बंदरजेटी परिसरात या कारवाईमुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या कारवाईबरोबर दांडी किनाऱ्यावर बंदर विभागाच्या जागेत बांधण्यात आलेले दोन कठडेही तोडण्यात आले होते.
दरम्यान, या कारवाईवर बोलताना बंदर विभागाने आमच्या जमीनीत असलेले बेकायदेशीर बांधकाम नियमानुसार कारवाई करत हटविण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर दामोदर तोडणकर यांनी बंदर विभागातील एका अधिकाऱ्याने आपल्याकडे पैशांची मागणी केली होती, मात्र आपण पैसे न दिल्याने आपल्यावर सुडभावनेने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यावेळी वीज वितरण विभागानेही सदरच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेले दोन्ही वीज मिटरही हटविले होते. कारवाईसाठी बंदर विभागाचे बंदर अधिकारी एस. व्ही. भुजबळ, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, अरविंद परदेशी, चौकीदार साहेबराव कदम, शंकर नार्वेकर हे अधिकारी सहभागी झाले होते. तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु पथकासह मालवण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी यावेळी बंदोबस्तासाठी तैनात होते. मालवण नगरपालिकेचेही अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. तलाठी गौतम दळवी, पोलीस पाटील विठ्ठल बावकर तसेच इतरही उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-आयुष्यमान-भव-कार्यक्रम/

बंदर विभागाने तोडणकर यांना दिलेल्या २४ तासांच्या नोटीसीमध्ये म्हटले होते, मालवण बंदर हद्दीमध्ये शासकीय जागेमध्ये वाहनतळामध्ये बांधकाम केलेले आहे. आपणास अतिक्रमण हटविणेबाबत कळविलेले होते. तरी सुद्धा आपण अतिक्रमण हटविलेले नाही. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी अतिक्रमण काढून टाकणे बाबतची कारवाई करण्यासाठी कळविले आहे. सदरची जागा ही भारतीय बंदर अधिनियम १९०८ चे कलम ४ (३) अन्वये महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिपत्याखालील मालवण बंदर हद्दीत येते. सदरचे बांधकाम करण्यासंदर्भात आपण या कार्यालयाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी नाहरकत दाखला घेतला नसल्याने निर्दशनास आले आहे. त्यामुळे आपण भारतीय बंदरे अधिनियम १९०८ चे कलम १० तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम १९२६ च्या कलम ३५ चे उल्लंघन केले असल्यामुळे, सदरचे अतिव क्रमण उपरोक्त नियमांच्या अधीन राहून निष्कासित करणे आपणास बंधनकारक आहे. तरी भारतीय बंदरे अधिनियम १९०८ चे कलम १० महाराष्ट्र सागरी मंडळ अधिनियम १९९६ चे कलम ३५ आणि शासन गृह विभाग निर्णय क्र. पीडीई ०६०५/अधिकाराचे प्रत्यावर्तन/प्र. क्र. १७०/ बंदरे २, दिनांक २९ नोव्हेंबर २००५ मधील तरतुदीना अधीन राहून आपणास या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, आपण ही नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासाच्या आत स्वखर्चाने हे अतिक्रमण विनाविलंब काढण्यात यावेत. अन्यथा कायद्याच्या तरतुदीस अधिन राहून आपल्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून सदरचे अतिक्रमण हे अतिक्रमण हटाव योजनेने दूर केल्यास त्यापासून होणाऱ्या नुकसानीस आपण स्वतः जबाबदार असाल तसेच अतिक्रमण हटाव योजनेचा खर्च आपल्याकडून वसूल केला जाईल. महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समूह, सिंधुदुर्ग ओरोस प्रादेशिक बंदर अधिकारी एस. व्ही. मुजबळ यांनी याबाबतची नोटीस दिली होती. त्यानुसार बुधवारी बंदर विभागाचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात कारवाईसाठी दामोदर तोडणकर यांच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहचले, त्यांनी तोडणकर यांच्याशी चर्चा करून सर्व सामान बाहेर काढण्याचे निर्देश दिले. बांधकामाच्या आतमध्ये असलेले काही प्रमाणातील महत्वाचे साहित्य बाहेर काढल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी तोडणकर यांनी आपण हायकोर्टमध्ये प्रकरण दाखल केले आहे, त्याठिकाणी कोणताही बांधकाम तोडण्याबद्दल आदेश झालेला नाही, जिल्हा कोर्टातही सुनावणी सुरू आहे, यामुळे कारवाई करू नये अशी भुमीका घेतली. बंदर अधिकारी एस. व्ही. मुजबळ यांनी बांधकाम तोडण्यात येवू नये अशाप्रकारचे आदेश दाखवा असे स्पष्ट करत कारवाई थांबणार नसल्याचे सांगितले. आणि त्यानंतर घडक कारवाई सुरू करण्यात आली.

व्यवसाय सुरू असतानाच कारवाई मालवण बंदरजेटीवर दामोदर तोडणकर यांचा पर्यटन व्यवसाय असल्याने त्याठिकाणी आजही मोठ्या संख्येने पर्यटक आलेले होते. यातील काही पर्यटक ऑफिसमध्ये आपले इतर सोबत आणलेले साहित्य ठेवून स्कुबा डायव्हींगसाठी समुद्रात गेले होते. ते आल्यानंतर त्यांना कारवाईची माहिती मिळताच त्यांनी तिक्रिया देण्याचे टाळले. त्यांना तोडणकर यांच्या कामगारांनी इतर व्यवस्था करत त्यांचे साहित्य आणून दिले आणि त्यानंतर पर्यटक रवाना झाले.

दामोदर तोडणकर यांनी तीव्र शब्दात बंदर विभागाच्या कारवाईचा निषेध केला आहे. सदरची कारवाई कोणत्याही कायदेशीर बाबींना धरून नसून आपल्यावर सुडभावनेने केलेली कारवाई असल्याचे म्हटले आहे. बंदर विभागातील एका अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आणि आपले घर जमीनदोस्त करण्यात सहभाग घेतलेल्या बंदर विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण सनदशिर मार्गाने लढा देणार असल्याचेही तोडणकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here