🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l देवगड l पांडुशेठ साठम –
देवगड तालुक्यातील शिरगाव गावी शनिवार दिनांक 25 जानेवारी पासून मित्र शिरगाव संस्थेचा 25वा… रोप्यमहोत्सवी नाट्य उत्सव सुरु होत आहे… त्याची रूपरेखा पुढीलप्रमाणे…https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
दिनांक 25 जानेवारी 2025 – शनिवार – संध्याकाळी 7 वाजता – थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित – मूक भट
संध्याकाळी 8.30 वाजता – थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित – स्टॅन्ड अप विनोद
दिनांक 26 जानेवारी 2025 – रविवार – संध्याकाळी 7 वाजता – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित – हत्ती घूस रेडा गेंडा (दोन अंकी दीर्घाक )
दिनांक 27 जानेवारी 2025 – सोमवार – संध्याकाळी 7 वाजता – शिरगाव हायस्कूल व मित्र शिरगाव निर्मित एकांकिका – एक्क्याची गोष्ट
संध्याकाळी 8 वाजता – वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित एकांकिका – शिमगो
संध्याकाळी 9 वाजता – समर्थ कलाविष्कार देवगड निर्मित एकांकिका – मशाल
मायबाप रसिक प्रेक्षक, कलाप्रेमी, नाटकप्रेमी, हौशी कलावंताना विनम्र आवाहन की सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी. सिंधुदुर्ग मधील कला क्षेत्रातील एक मोठी संस्था “मित्र शिरगाव” च्या 35 वर्षांच्या चळवलीला आपला पाठिंबा, सहभाग, कौतुक आणि प्रेम लाभावे अशी नम्र अपेक्षा..!!!
मित्र शिरगाव – कला विभाग