⭐सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी आणि अभिनेत्री अंकिता नाईक यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ-(गोपाळ पावसकर) – गेली २१ वर्षे सातत्याने मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या मंचाच्या सर्वेसर्वा माजी नगरसेविका सौ निलम पालव सावंत ह्या सातत्याने तळागाळा तील लहान थोर महिलांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी नेहमी च झटत असतात. https://sindhudurgsamachar.in/kokan-सोशल-मिडीया-फ्रंट-कोकण-वि/
८ मार्च २०२४ रोजी ह्या कार्यक्रमाच्या पाक कलेच उद्घाटन अभिनेत्री अंकिता नाईक तसेच महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनने करण्यात आले.सर्व स्तरातील महिलांना व्यासपीठ मिळून देणाऱ्या सौ निलम पालव ताई ह्यांचं अभिनेत्री सौ कांबळी ह्यांनी आपल्या खास मालवणी भाषेत बोलून भरभरून कौतुक करत उपस्थित महिलांच्यात उत्साह निर्माण केला.
तसेच गेली अनेक वर्षे समाज सेवेबरोबर कोकण ची लोककला असलेली दशावतार ही कला सातत्याने जोपासणाऱ्या अभिनेत्री कांबळी ह्यांचा खासदार विनायक राऊत ह्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .ह्या कार्यक्रम मधे चर्मीन लेडी ,डान्स विविध प्रकार च्या नाटिका सादर करण्यात आल्या तसेच कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला .