Kokan: मुणगे आड बंदर तालुका देवगड वाशी यांचे पाणी रस्ता आणि अनेक सुविधा मिळण्यासाठी साखळी उपोषण आज तारीख 31 जानेवारी चालू झाले.

0
60
मुणगे ग्रामपंचायत ,
मुणगे ग्रामपंचायत कडून आडबंदरला होणारा पाणीपुरवठा गेले ७ महिने बंद

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

मुणगे- मुणगे आड बंदर तालुका देवगड वाशी यांचे पाणी रस्ता आणि अनेक सुविधा मिळण्यासाठी साखळी उपोषण आज तारीख 31 जानेवारी चालू झाले आहे. मुणगे आडबंदर नळयोजनेवर ९४ लाख रुपये खर्च झाले पण पाणीपुरवठा सुरळीत आजपर्यंत झाला नाही. नेमक पाणी मुरले कुठे याचा शोध घेण गरजेचे आहे. आडबंदर विकास मंडळचे आज पासून तारीख ३१/०१/२०२४ पासून साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-दादासाहेब-फाळके-आतंराष्/

कारण मुणगे ग्रामपंचायत कडून आडबंदरला होणारा पाणीपुरवठा गेले ७ महिने बंद आहे. तसेच जुनी पाईप लाईन नादुरुस्त झालेली आहे. जनजीवन मिशन योजनेतून मागे-आडबंदरसाठी मंजूर झालेल्या कामाचा कार्यारंभ दि. ०८/०२/२०२३ ला प्रस्तावित होता. काम पूर्ण करण्याची अंतिम दि. २८/०२/२०२४ आहे. पण अद्याप काम गुरु झालेले नाही. तीन वर्षापुर्वी मुणगे आडबंदर नळयोजनेवर ९४ लाख रुपये खर्च झाले हाते, पण पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. ग्रामस्थांनी याच्या चौकशीची मागणी करुनही त्याची चौकशी झाली नाही. यासाठी आमचे आंदोलन वरील गोष्टींना जवाबदार असलेल्या न्याय व्यावस्थापनेच्या विरोधात आाहे. जलजीवन मिशनचे काम सुरु होऊन कधी पूर्ण होणार याचे ठोस उत्तर मिळाल्यावर खेरीज हे साखळी उपोषण / आंदोलन मागे घेण्यार नाही यावर ग्रामस्थां ठाम अलसल्याचे मुणगे ग्रामस्थांनी म्हणने आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here