म्हापण-: आठवडाभर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हापण चव्हाणवाडी येथील सिताबाई दादू चांभार यांच्या राहत्या घरावर पहाटे आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी पहाटे आब्यांचे झाड घरावर पडले, त्यावेळी घरामध्ये माणसे झोपलेली होती.केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.परंतु झाड घरावर पडल्याने फर्निचर,पत्रे यांचे मोठ्या प्रमाणात मात्र नुकसान झाले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पत्रादेवी-महामार्गावर-इ/
घटना घडली त्यानंतर म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण व पती विश्वनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पहाणी करत विचारपूस केली.त्याचप्रमाणे उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर, ग्रामपंचायत कर्मचारी सावळाराम म्हापणकर विजय ठाकूर, बाळकृष्ण दाभोलकर, यांनी देखील या ठिकाणी धाव घेत पहाणी केली.त्यानंतर म्हापण तलाठी दिगंबर डवरे व कोतवाल पप्पू कोनकर यांनी घटनास्थळी भेट देत सविस्तर माहिती घेऊन पंचनामा केला.यावेळी वाडीतील ग्रामस्थ देखील उपस्थित होते.