Kokan: म्हापण जिल्हा परिषद मतदार संघामध्ये जो विकास दिसत आहे तो लोकप्रिय आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीमुळे-सचिन देसाई

0
5
महायुतीच्या माध्यमातून विविध मंजूर झालेल्या विकासकामांची भूमीपूजन
म्हापण जिल्हा परिषद मतदार संघामध्ये जो विकास दिसत आहे तो लोकप्रिय आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीमुळे-सचिन देसाई -

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –

म्हापण/संदीप चव्हाण – वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व महायुतीच्या माध्यमातून विविध मंजूर झालेल्या विकासकामांची भूमीपूजन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालोंड-बेलाची-वाडी-येथे-भ/

यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांनी म्हापण जिल्हा परिषद मतदार संघामध्ये जो विकास दिसत आहे तो आमच्या भागातील लोकप्रिय आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीमुळे आहे .मंत्री केसरकर यांची जी काम करण्याची धडपड आहे त्यातून आपल्या भागातील कायापालट होताना दिसत आहे.दिपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर झाला आहे.

यापुढे अशीच विकासाची गंगा वाहणार असून त्यासाठी येथे विधानसभेत मंत्री केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.तसेच वेंगुर्ले तालुका अध्यक्ष नितीन मांजरेकर यांनी देखील आपल्या भागातील राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा दिपक केसरकर यांना आपण मंत्री पदावर बसण्याची संधी देऊन दीपक भाई यांच्या हात बळकट केले पाहिजे. तसेच यापुढे माजी सरपंच महेश सामंत यांनी बोलताना केवळ निवडणूक जवळ आली की दिपक केसरकर काम करत नाहित तर गेल्या पाच वर्षांत प्रत्येक पाहिजे त्या विकास कामांसाठी केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निर्देश दिला आहे त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातही विकास हवा आहे. त्यांचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हणत येणाऱ्या काळात मंत्री केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर,भोगवे माजी सरपंच महेश सामंत, विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर, जान्हवी तेली, ओंकार सामंत चेतन सामंत संभाजी आचरेकर,मच्छीमारी सेल तालुका काशीनाथ नार्वेकर,माजी सभापती वेंगुर्ले वंदना किनळेकर,कुशेवाडा सरपंच निलेश सामंत,माजी नायब तहसीलदार सुभाष चौधरी,कोचरे तंटामुक्त अध्यक्ष ब्रिजेश तायशेटे,मेढा निवती सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच अनंत सापळे कुशेवाडा,श्रीरामवाडी बुथ प्रमुख आबा कोचरेकर, विष्णु फणसेकर ,निवती पोलिस पाटील जोगेश सारंग ,श्रीरामवाडी पोलिस पाटील आर्या आंबडोसकर,कालवंडवाडी पप्पू पवार , माधवी सरमळकर, किल्ले निवती सरपंच रुपेश मुंडये, केसरकर, रमेश गावडे, प्राजक्ता चिपकर माजी सरपंच कर्ली, तन्वी दुधवडकर,संतोष करलकर माजी उपसरपंच,प्रकाश राणे तंटामुक्ती अध्यक्ष कुशेवाडा, परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र भाई खवणेकर , डॉ.माइणकर मॅडम, डॉ.मोळके वैद्यकीय अधिकारी परुळे सर्व महायुती पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या म्हापण जि.प मतदार संघातील या कामांची भूमी पूजन निवती-कोचरा हि दोन गावं जोडणार पूल यासाठी ५ कोटी निधी मंजूर,निवती-श्रीरामवाडी जोडणारे झुलते पूल यासाठी ५कोटी रुपये मंजूर, परुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधणे ३कोटी २४लाख रुपये निधी मंजूर, मुख्यमंत्री सडक ग्रामीण मार्ग ५ रस्ता परुळे ते कर्ली मंजूर रक्कम ३कोटी ४३लाख रुपये, किल्ले निवती ते किल्ल्याकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे ५० ला रुपये निधी मंजूर, चिपी कालवंड येथील रस्ता या कामांची भूमी पूजन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here