Kokan: ‘या जन्मावर प्रेम करावे..‘ वेंगुर्ल्यात कार्यक्रम

0
69
Mangesh Padgavkar,
‘या जन्मावर प्रेम करावे..‘ वेंगुर्ल्यात कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. उभादांडा शाळा नं.२ येथे प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर ‘या जन्मावर प्रेम करावे‘ हा काव्यवाचन व काव्यगायन असा कार्यक्रम होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-निवडणूक-निकालानंतरच-तल/

 ज्येष्ठ कवी अजित राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ लेखक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच निलेश चमणकर यांच्या हस्ते होईल. तर कार्यक्रमाचे निवेदन पांडुरंग कौलापूरे व प्रितम ओगले हे करणार आहेत. यात वेंगुर्ला तालुक्यातील अनेक रसिक मंगेश पाडगावकर यांच्या कविता वाचून तसेच काही रसिक गाऊन सादर करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here