रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्मचारी भरती प्रस्तावित आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून, पात्र उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. ९० मार्कासाठी ९० प्रश्न असतील, हे प्रश्न ९० मिनिटांत ऑनलाईन पध्दतीने सोडवावयाचे आहेत. या परिक्षेच्या तारखा, परिक्षा केंद्र याबाबतीत माहिती संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे उमेदवारांनी अवलोकित करावी. ऑनलाईन पध्दतीने होणारी ही परिक्षा उमेदवारांच्या गुणवत्तेला पूर्ण संधी देणारी असणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-म्हाडाची-फेक-वेबसाईट-आल/
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवर विश्वास ठेवावा. अकारण अन्य ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या बातम्या, होणाऱ्या चर्चा यामुळे विचलित होऊ नये, अगर चुकीच्या माहितीमुळे आपली दिशाभूल करून घेऊ नये. संकेतस्थळावर यूजर गाईडमध्ये असलेला प्रश्नसंच हा डेमो म्हणून दिला आहे. संपूर्ण पध्दती समजावी म्हणून ते एक उदाहरण आहे. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा. उमेदवारांनी या ऑनलाईन परिक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करून ९० मार्कापैकी अधिकाधिक मार्क प्राप्त होतील अशी तयारी करून आत्मविश्वासाने ऑनलाईन परिक्षेला सामोरे जाऊन आपण यश संपादन करावे, असे प्रसिध्दीपत्रक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रसिध्दीसाठी दिले आहे