Kokan: रत्नागिरी शहरामध्ये भरदिवसा वृध्द महीलेला मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 24 तासांत अटक

0
16
जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 24 तासांत अटक.
रत्नागिरी शहरामध्ये भरदिवसा वृध्द महीलेला मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून 24 तासांचे आतमध्ये अटक.

⭐चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत.

रत्नागिरी/राहूल वर्दे- – दि 28/09/2024 रोजी सकाळी 08.45 वा. चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील वॉशींग रॅम्प जवळ असलेल्या घरामधील एकटयाच असलेल्या एका वयोवृध्द महिलेला मारहाण व दुखापत करुन तिचे हातामधील दोन सोन्याच्या बांगड्या व गळयामधील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केलेली होती त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 370/2024 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 309 (6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता.https://sindhudurgsamachar.in/kokan-अर्चना-घारे-परब-यांच्या-ज/

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्यामाहीतीवरुन सदरचा गुन्हा हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर तळवडेकर हीचे मदतीने केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने गोपनीय माहीतीचे आधारे संशयीत आरोपी शेखर तळवडेकर, वय 47 वर्षे, सौ. आश्लेषा तळवडेकर वय 48 वर्षे दोन्ही रा. ओम शांती प्लाझा, लक्ष्मी चौक, गाडीतळ रत्नागिरी मूळ रा. तळवडे ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग यांना 24 तासांचे आतमध्ये ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेले एकूण 1,64,000/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने (100% मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच सपोनि / श्री.तानाजी पवार पोहेकॉ / विजय आंबेकर पोहेकों / दिपराज पाटील पोहेकों योगेश नार्वेकर पोहेका / विवेक रसाळ मपोहेकों / वैदेही कदम पोना / दत्तात्रय कांबळे यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here