Kokan: रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा; कायम रात्रीचा निर्णय भावनिक होता

0
72
रत्नागिरी-सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा
धमकी दमबाजीला मी भीक घालत नाही - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी– सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. किरण सामंत यांनी ट्विट मागे घेतलं आहे. आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून माघार घेतली. उद्या रत्नागिरीला बैठक घेऊ. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांची भावना आहे ही जागा शिवसेनेकडे असावी. https://sindhudurgsamachar.in/पोलिस-असल्याचे-सांगून-व्/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. मात्र ही जागा आमच्याकडेच राहावी अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिंदेंना वाटाघाटी कराव्या लागतात याचं वाईट वाटतं, अशी खंत देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील व्हायरल झाली मात्र किरण सामंतांकडून ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न आहे. मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे.

तिकीट देण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. आम्ही राज्यात 45 पार नक्की जाऊ, फॉर्म्युला ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आगे. जो काही फॉर्म्युला ठरेल तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही उदय सामंत म्हणाले. किरण सामंतांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. अजूनही शिवसेनेचा दावा जर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर असेल तर कोकणातील स्थानिक नेते नारायण राणे याला उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा शिवसेनेला सोडली तर राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here