Kokan: रसिका पालकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

0
55
रसिका पालकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
रसिका पालकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

वेंगुर्ला प्रतिनिधी- बाजारपेठ मित्रमंडळ व वेंगुर्ला शहर शिवसेनेतर्फे दीपावली शो टाईम अंतर्गत खास महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘खेळ पैठणी‘ कार्यक्रमात रसिका पालकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना पॉप्युलर क्लॉथ स्टोअर्सचे संचालक अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली मानाची पैठणी सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-किल्ला-बांधणी-स्पर्धेत-ब/

गाडीअड्डा नाका येथे १६ ते १८ नोव्हेंबर कालावधीत दीपावली शो टाईम कार्यक्रम घेण्यात आला. १७ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात सुमारे ३३ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेतील द्वितीय विजेती रिया टेमकर हिला वक्रतुंड ज्वेलर्सचे संचालक भाऊ मालवणकर पुरस्कृत सोन्याची नथ देण्यात आली. तर उर्वरित सहा क्रमांकाच्या विजेत्या अनुक्रमे राणी पाखरे यांना तांब्याची टाकी, इंद्रायणी मठकर यांना ज्युसर, उर्मिला पेडणेकर व प्रिती जाधव यांना भेटवस्तू देण्यात आली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा बाजारपेठ मित्रमंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तर प्रथम तीन क्रमकाच्या विजेत्यांना ‘हेअर अॅण्ड हेवन‘ संचालिका पूनम बोवलेकर यांच्याकडून मोफत ब्युटी पार्लर सेवा दिली जाणार आहे. स्पर्धेचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले. दीपावली शो टाईमच्या तिन्ही दिवशी प्रेक्षकांसाठी लकी ड्राॅ ठेवण्यात आला होता. 

बक्षिस वितरणप्रसंगी अशोक ठोंबरे, स्वप्निल पांडजी, जयेश गावडे, संदिप गावडे, महेश केरकर, विजय गावडे, बाळा आरावंदेकर, सदा पांजरी, सदा शारबिद्रे, घन्शा आरावूज, विजय विश्वकर्मा, राकेश सापळे, भाऊ मालवणकर, मिलिद केरकर, यशा किनळेकर यांच्यासह बाजारपेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. १८ नोव्हेंबर रोजी ओमी डान्स अकॅडेमी प्रस्तुत हिदी, मराठी बहारदार नृत्याचा कार्यक्रमाने दिपावली शो टाईमची सांगता झाली.

फोटोओळी – रसिका पालकर यांना मानाची पैठणी प्रदान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here