Kokan: राज्यशासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सिंधुदुर्ग ग्रामपंचायत सदस्य सौ वर्षाराणी ब.अभ्यंकर व माजी सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यांना प्रदान

0
128
राज्यशासन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार, ग्रामपंचायतील सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व माजी सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यांना ग्रामपंचायत देऊळवाडा येथे प्रदान करण्यात आला
राज्यशासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊळवाडा/मसुरे ता.मालवण,जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतील सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व माजी सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यांना ग्रामपंचायत देऊळवाडा येथे प्रदान

सिंधुदुर्ग – यावर्षीचा राज्यशासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामपंचायतील सदस्य देऊळवाडा,मसुरे ता.मालवण,जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतील सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व माजी सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यांना ग्रामपंचायत देऊळवाडा येथे प्रदान करण्यात आला

राज्यशासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारदेऊळवाडा/मसुरे ता.मालवण,जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतील सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्यां सौ वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व माजी सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यांना ग्रामपंचायत देऊळवाडा येथे प्रदान करण्यात आला

हा पुरस्कार राज्यात सामाजिक, महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. याची अंमलबजावणी 9 मे 2023 पासून करण्यात आली .दि.31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती दिवशी केली. हा पुरस्कार सन्मानपत्र,शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख 500 रु.च्या स्वरूपात देण्यात आला.या पुरस्काराच्या यावर्षीच्या पहिल्या मानकरी सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर व सौ.आदिती अमोल मेस्त्री ठरल्या. यांना वरील पुरस्कार सरपंच सौ.सुरेखा सतीश वायंगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-दहावीनंतरच्या-प्रथम-वर/

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. साधना चौगुले, सौ मनीषा बागवे सदस्य अशोक मसुरकर श्री.विठ्ठल लाकम तसेच आशा बालवाडी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ महिला,कर्मचारी, शिपाई आदी उपस्थित होते. ग्रामसेवक सुनील मळगावकर यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.हा सोहळ्याचं प्रास्ताविक उपसरपंच नरेन्द्र सावंत तर आभार प्रदर्शन सदस्य.साधना चौगुले यांनी मांडले.एकूणच सगळयाच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here