Kokan : राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यांचा वेंगुर्ला येथे सत्कार

0
93
राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यांचा वेंगुर्ला येथे सत्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यांना जाहीर झाल्याबद्दल रा। कृ पाटकर हायस्कूल मैत्री ८९ या ग्रुप संस्थेच्या वतीने  शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

रा.कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ला मधील माजी विद्यार्थी मैत्री ग्रुप ८९ तर्फे वेंगुर्ला उभादांडा येथील हाॅटेल नार्वेकर  सभागृहात येथे आयोजित मैत्रीपूर्ण स्नेहमेळाव्यात शैक्षणिक , सामाजिक , पत्रकारिता , बॅकींग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांग चित्रकार याच्या यशस्वितेबद्दल गौरवार्थ सन्मान करण्यात आला https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-समुहगीतमध्ये-वेताळ-विद/

 माजी विद्यार्थी स्नेहमेळावा सेवानिवृत्त रमेश पिंगुळक , वेतोरा सातेरी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व संचालक. प्रभाकर नाईक  ,कॅनरा बँक मॅनेजर  श्री. आंबेरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वेंगुर्ला मठ शाळा नंबर 2 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत सावंत , अपंग चित्रकार कुमारी पूजा धुरी व पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कौलगेकर यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करीत  असलेल्यांचा मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला 

रा. कृ. पाटकर हायस्कूल ८९ बॅचचे  माजी विद्यार्थी अमर दाभोलकर ,  अविनाश शिरोडकर ,  कमलेश सामंत , हितेंद्र रेडकर ,  बापू नाईक , हरिश्चंद्र शिरसाठ , रायाजी सातोस्कर , संदीप केळजी , मुनाफ जाफर कादर ,  दोस्ती रणजित आचरेकर ,  समीर गावडे  , आनंद गावडे , रूपेश तांडेल , सचिन नवार ,  राणी मडकईकर , मंगेश मलबारी ,  सचिन बोवलेकर , सुहास मांजरेकर आदी उपस्थित होते 

मैत्री ८९ या ग्रुप संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो यावर्षी वेंगुर्ले येथील दिव्यांग मुलगी कलाकार पूजा धुरी वेंगुर्ला मठ शाळा नंबर दोन चे प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक ग्लोबल गोल स्टार अवॉर्ड विजेते चंद्रकांत सावंत पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी व ग्राफिक नियंत्रण याबद्दल वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पत्रकारितेतील सर्वोच्च मानला जाणारा राज्यस्तरीय दर्पण पत्रकार पुरस्कार विजेते सुरेश कोलगेकर यांचा सन्मान करण्यात आला 

 वेंगुर्ला पंचायत समितीचे निवृत्त गटविकास अधिकारी रमेश पिंगुळकर व सातेरी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक व वेंगुर्ला कॅनरा बँकेचे मॅनेजर आंबेसकर आदिनी मार्गदर्शन केले यावेळी पाटकर हायस्कूल चे शिक्षक महेश बोवलेकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले

फोटो ओळी

 राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकार सुरेश कोलगेकर यांचा सन्मान करताना मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here