Kokan: ‘रावे ‘उपक्रमांतर्गत चंद्रनगर येथे बियाणे जनजागृती’ कार्यक्रम

0
54
'रावे 'उपक्रमांतर्गत चंद्रनगर येथे बियाणे जनजागृती' कार्यक्रम
'रावे 'उपक्रमांतर्गत चंद्रनगर येथे बियाणे जनजागृती' कार्यक्रम

दापोली- डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथी शेतकऱ्यांसाठी नुकताच बियाणे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. ‘रावे ‘ उपक्रमांतर्गत डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या बियाणे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-आजी-आजोब/

या कार्यक्रमात योग्य बियाण्याची निवड करताना कोणती दक्षता घ्यावी, त्याची उगवणक्षमता तपासणी कशी करावी, बियाण्यांच्या पाकिटावर असलेल्या खूणचिठ्ठीवरून बियाण्याचा प्रकार कसा ओळखावा, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे काय फायदे आहेत, बियाण्यांतून पसरणारे बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय करावेत, बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी कोणती जैविक व रासायनिक प्रक्रिया करावी, हेक्टरी रोपांची संख्या कशी निर्धारित करावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उपयुक्त जैविक बुरशीनाशके विकसित केली आहेत. अशा बुरशीनाशकांचा वापर कसा करावा यासाठीचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना रावे च्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले. या कार्यक्रमातून येथील शेतकऱ्यांना बियाण्यांसदर्भात उपयुक्त माहिती मिळाली. या कार्यक्रमासाठी रावे च्या विद्यार्थ्यांना चंद्रनगर येथील सुरेश मुलूख यांचे विशेष सहकार्य लाभले. बियाणे जनजागृती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धिविनायक साळुंके, जयसिंगराव चव्हाण, हरीश बागूल, मयुरेश गोडसे, अभिषेक पाटील, सुधांशु गोलामडे, तुषार तांडेल, अभिराज खरात, प्रथम साखळकर, समर्थ कावळे, मयूर सुरवसे, उदय आरोटे, प्रथमेश सपकाळे, धैर्यशील पाटील, प्रवीणसिंह जाधव, विनायक पिसे, तेजस बावस्कार, संघर्ष तायडे या रावे च्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here