वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणा-या वर्धापन दिनानिमीत्त वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणाची जबाबदारी देण्याबाबत तसेच दहावी-बारावी परीक्षेत तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे आणि पक्षाच्यावतीने देण्यात येणारे उपक्रम तालुक्यात व शहरात राबविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ठरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-अमरावती-येथील-श्री-अंबा/
वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण व शहर कार्यकारीणीची एकत्रित बैठक वेंगुर्ला-हॉस्पीटल नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात तालुका अध्यक्ष योगेश कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, तालुका महिला अध्यक्षा दिपिका राणे, माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, वैभव वाडकर, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, सुप्रिया परब, कुणाल बिडये, अपूर्वा परब, प्रदीप पडवळ, विशाल बागायतकर, रामेश्वरी गवंडे, राजू गवंडे आदी उपस्थित होते.
सावरकर जयंती दिनाच्या कार्यक्रमामध्ये दिल्ली येथील महाराष्ट्र सदना मध्ये महाष्ट्राची अस्मिता असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे असलेल्या ठिकाणावरून हलवून अवहेलना केल्याबद्दल तसेच महीला खेळाडुंना दिल्लीत संसद भवनाच्या उदघाटना दिवशीच मारहाण केल्याबद्दल राज्य सकारकारचा जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी झालेल्या संघटनात्मक चर्चेत संपूर्ण तालुका व शहर भागातील बुथ कमिट्या मजबुत करून विभागिय कमिट्या स्थापन करण्यांबाबत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्षांची नव्याने नियुक्ती झाल्याने येत्या जून अखेर पर्यंत पूर्ण तालुक्यात संफ अभियान राबविल्यानंतर नविन तालुका कार्यकारणी करण्याचे ठरविण्यात आले. ग्रामीण व शहर कार्यकारणीच्या बैठका दर महिन्याच्या पहिला व तिस-या सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता घेण्याचे सर्वानमुते ठरविण्यात आले. या सभेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष योगेश कुबल यांनी तर आभार शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी मानले.
फोटोओळी – राष्ट्रवादीच्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.