🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / मुंबई /प्रतिनिधी:
राजकीय वर्तुळात बाकी कुठल्या पदा बाबत ठाम माहीत नसले तरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार या चर्चांना उधाण होतेच.आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-येथील-श्री-देव-लक्/
राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून विधानसभेत एकमताने राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले असून राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत