🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /कुडाळ / मनोज देसाई
वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात येत्या ८ ते १२ डिसेंबर कालावधीत, वेद व वेदांग प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या तर्फे अनुष्ठान व पारायण इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-निवती-किनारपट्टीने-घेत/
८ डिसेंबर रोजी पासून दररोज सकाळी, धार्मिक विधी, पारायण, सायंकाळी – ४वा. ह.भ.प. मुंडले बुवा यांचं कीर्तन,
९ रोजी सायंकाळी,४वा. अवधूत धुपकर बुवा व सुपर्ण पोखरणकर बुवांचे कीर्तन,
१० रोजी, सायंकाळी रोहन पुराणिक,व पुरूषोत्तम पोखरणकर यांचं कीर्तन,
सायंकाळी ७.३० वा.( श्रींची इच्छा कलामंच तेंडोली ) यांच्या तर्फे बाळ कोल्हटकर लिखीत ,’ दुरितांचे तिमीर जावो ‘ हे संगीत नाटक.
११ रोजी – ४ वा. दत्तात्रय उपाध्ये यांचे कीर्तन,
१२ रोजी- दुपारी १ वाजता आरती आणि प्रसाद व सांगता.
याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण संयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे .