Kokan: विद्यार्थ्यांनी अनुभवले आश्रमातील जीवन

0
59
डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल, सविता आश्रम
विद्यार्थ्यांनी अनुभवले आश्रमातील जीवन

वेंगुर्ला प्रतिनिधी- आश्रमातील लोकांचे जीवन पाहून मुलांमध्ये समाजभान निर्माण करण्याच्या उद्देशाने नविन वर्षाच्या प्रारंभी १ जानेवारी रोजी मठ येथील रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची पणदूरमधील संविता आश्रम व डिगसमधील सक्षम आश्रमाला भेट घडवून आणली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुलांनी-नोकरीपेक्षा-उद्/

संविता आश्रमाचे व्यवस्थापक एम.जी.कामत यांच्या सहकार्याने व संस्थापक संदिप परब यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी आमश्रातील सहजीवन, सेवा, नियोजन, व्यवस्थापन समजून घेतले. तर सक्षम आश्रमातील कृषी तंत्रज्ज्ञ चेंदवणकर यांनी मुलांना आधुनिक शेतीची गरज, त्याचे महत्त्व, फायदे याबाबत माहिती दिली. आशिष कांबळी आणि सर्व सहकारी यांनी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन उपलब्ध करून दिले. यावेळी घेतलेल्या आजीआजोबांवरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

दोन्ही आमश्रातील भेटीप्रसंगी मुख्याध्यापक एस.ए.जाधव, शिक्षक गणूराज गोसावी, स्वप्नाली कांबळी, शिक्षकेत्तर अतुल वाढोकर, नरेंद्र नाईक, दिगंबर मोबारकर आदी उपस्थित होते. हायस्कूलच्यावतीने संविता आश्रमला आर्थिक मदत करण्यात आली.

फोटोओळी – मठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संविता आश्रमाला भेट देत तेथील जीवन अनुभवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here