Kokan: वेंगुर्ला येथे सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ

0
34
वेंगुर्ला येथे सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी पार्सेकर दत्त मंदिर (कैवल्याश्रम मंदिर) येथे दत्तगुरूचरणी गायन सेवा अर्पण केली. तर याच देवालयाच्या माडीवर श्री सद्गुरू संगीत विद्यालय, (शाखा-वेंगुर्ला) याचा शुभारंभ गुरूवर्य निलेश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, हार्मोनियम व तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण तसेच गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची शिकवणी घेतली जाणार आहे.  या मंदिरात असलेल्या विद्यालयातून दर शनिवार-रविवार तबला विशारद निरज भोसले, हार्मोनियम विशारद मंगेश मेस्त्री, संगीत विशारद भास्कर मेस्त्री हे विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एशियाबुकऑफरेकॉर्ड्सक/

      तत्पूर्वी सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटेसंगीत अलंकार डॉ. श्रीराम दिक्षितसंगीत विशारद भास्कर मेस्त्रीविशारद केतकी सावंत यांनी आपल्या सुश्राव्य संगीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यालयाच्या शुभारंभप्रसंगी अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे-परबप्राचार्य एम.बी.चौगुलेसामाजिक कार्यकर्ते राहूल प्रभूसाळगावकरतबला वादक किशोर सावंतसोमा सावंतडॉ. श्रीराम दिक्षितमाजी नगरसेविका अॅड.सुषमा खानोलकरश्रेया मयेकरहेमंत खानोलकरपुजा दळवीअॅड.सिद्धी परबनितीन धामापुरकरमानसी भोसलेभावना सावंतश्रीकांत जोशीसोनाली प्रभूसाळगावकरदत्ता कुळकरकेतकी सावंतसर्वेश राऊळगोविंद मळगावकरस्वप्निल राऊळऋतिक परबवैभव परब आदी उपस्थित होते.

      वेंगुर्ला ही कलावंतसाहित्यिक अशा दिग्गजांची भूमी आहे. इथली लोक ही कलेची जाण असणारी आहेत. त्यामुळे या संगीत विद्यालयातून निश्चितच चांगले गायकवादक घडतील असा विश्वास अर्चना घारे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज भोसलेस्वागत भास्कर मेस्त्री यांनी केले. सुत्रसंचालन विनायक गांवस तर आभार मंगेश मेस्त्री यांनी मानले.

फोटोओळी – श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here