Kokan: वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

0
23
वेंगुर्ला, रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव
वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-

वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शनिवारपासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी सकाळी उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले. सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता श्री देव रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘हिरण्यनयन-अंधकासूर‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच मंगळवार दि. २५ रोजी रात्रौ ७.३० वा. दत्त प्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा यांचे भजन, दि.२६ फेब्रुवारी रोजी धार्मिक विधी, रात्री सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे आगमनानंतर तरंग देवतांसह श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा, त्यानंतर तरंग देवतांकडून रथावर नारळ वाढवून रथ प्रदक्षिणेस सुरुवात होईल. रथ प्रदक्षिणेनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. श्रींच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here