वेंगुर्ले : वेंगुर्ले कुबलवाडा, भराडी मंदिर शेजारी आंब्यांच्या झाडावर औषध फवारणी करताना झाडाची फांदी तुटून कामगार खाली पडून मयत झाला आहे. शेखर महादेव नाईक, वय ४९ राहणार वेंगुर्ले परबवाडा कणकेवाडी असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना आज शनिवार २ मार्च रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ज्येष्ठ-समाजसेवक-कृष्ण/
कुबलवाडा येथे घडलेली ही आंबा बागायत दार यांच्या हलग्रर्जीपणामुळे घडली आहे. तसेच या कामगारांना कोणतेही सेफ्टीबेल्ट दिले जात नाहीत. विषारी द्रव्यऔषध फ.वारणी करतेवेळी हातमोजे , मास्क डोळ्याच्या सुरक्षतेची साधने आंबा बागायतदार जाणिवपुर्वक पुरवत नसल्याने असे बळी जात आहेत. शिवाय आठ दहा मजूर एखाद्या कडे काम करत आहेत तर त्यांचा किमान वार्षीक विमा उतरवणे गरजेचे आहे. या मुळे मयत कामगारांच्या कुटूंबाला थोडी फार मदत होऊ शकेल.