Kokan: वेंगुर्ले शहराला विविध विकास कामातून गत वैभव प्राप्त करून देण्याचे दिपक केसरकर यांचे प्रयत्न- उमेश येरम

0
21
वेंगुर्ले शहर विविध विकास काम
वेंगुर्ले शहराला विविध विकास कामातून गत वैभव प्राप्त करून देण्याचे दिपक केसरकर यांचे प्रयत्न- उमेश येरम

वर्षभरात ३९ कोटी रूपयांचा निधी वेंगुर्लेत न. प. ला दिला

 वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
   महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे सत्ताधारी आमदार दिपक केसरकर यांचे प्रयत्नातून व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने वेंगुर्ले नगराच्या विविध स्वरूपाच्या विकास कामासाठी ३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. यातील अनेक कामे प्रगती पथावर आहेत. आज जी शहरातील सर्व रस्त्यांची डांबरीकरणाची विविध विकास कामे सुरू आहेत. त्या विकास कामांमुळे वेंगुर्ले शहरास गत वैभव प्राप्त करून देण्याचा मानस श्री. केसरकर यांचा आहे. अशी माहिती शिवसेना पश्नाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-मातोंड-सातेरी-देवीचा-वर्/

वेंगुर्ले शहरातील सप्तसागर कॉम्प्लेक्समधील तालुकास्तरीय शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजेरकर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांचा समावेश होता.महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या वर्षभरात वेंगुर्ले शहराच्या विकासाचे व्हीजन समोर ठेवून मंत्री व सत्ताधारी आमदार म्हणून मिळणाऱ्या विविध हेड खाली फार मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे. यात वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजने करिता ३ कोटी १ लाख ५३ हजार ४०० रुपये मंजूर असून यात पाण्याची पाईप लाईन बदलणे व मिटर बसवणे या कामांचा समावेश आहे. विशेष रस्ता अनुदान मधून ६ कोटी १९ लाख २७ हजार १२५ रुपये मंजूर असून वेंगुर्ले शहरांतील सर्व रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. वैशिष्टयपूर्ण विशेष अनुदान मधून ८ कोटी ७१ लाख २३ हजार ३०७ रुपयांचा निधी मंजूर आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराध्यान महाअभियान या मधून ३ कोटी ९२ लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. तसेच आमदार स्थानिक विकास फंडातून ५५ लाख रुपयांचा निधी वेंगुले नगरपरीषदेस प्राप्त झालेला आहे.

वेंगुर्ले बंदर झुलत्या पुलापासुन बंदरकडे जाणाऱ्या रोडच्या मध्यवर्ती पासून समुद्राच्या दिशेने रोडवायडींग, सायकलींग ट्रॅक, वॉकींग ट्रॅक व फुडमॉल तयार करणे या महत्वपूर्ण विकास कामासाठी १५ कोटी ३६ लाख रूपये मंजूर झालेले आहेत वेंगुर्ले बंदर ते झुलता पूल पर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी पर्यटन हेडमधून ७५ लाख रू. निधी मंजूर झालेला आहे. पर्यटन हेडमधून रामेश्वर देवस्थान सुशोभिकरण करिता ३५ लाख रू. निधी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर झालेला असून त्याचे प्रत्यन्न कामही सुरू झालेले आहे. तसेच पर्यटन वाढीकरीता सिंधुरत्न विकास योजनेमधुन मानसी गार्डन ते मांडवी खाडी पर्यंत सायकलींग ट्रॅक, वॉकींग ट्रैक व इतर सुविधांसाठी तसेच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यांत आलेली आहे.

निविदा प्रक्रिया झालेली व सुरु झालेली कामे
वहखोल येथील धरणग्रस्त लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर पंप बसविण्यासहित इतर कामांसाठी २० लाख रुपये, दाडाचे टेंब ते पंप हाऊस पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आणि स्मशानभूमीच्या ठिकाणी संरक्षक भिंत यासाठी ३५ लाख रुपये, कुबलवाडा ते गणेश हार्डवेअर दुकानापर्यंतचा रस्ता ३५ लाख रुपये, कॅम्प म्हाडा येथे एक लाख लिटर पाण्याची टाकीसाठी २५ लाख रुपये, सातेरी मंदिर ते शासकीय गोदाम पर्यंतचा रस्ता सिमेंट करणे १५ लाख रुपये मल्टीपर्पज हॉलमध्ये सुविधेच्या दृष्टीने जनरेटर बसवण्यास ३२ लाख रुपये। मांगले यांचे घर ते सातेरी मंदिर रामदास परब यांच्या घरापर्यंतच्या गटाराचे आरसीसी कामासाठी २५ लाख रुपये निधी प्राप्त झालेला असुन त्याची निवीदा प -क्रियाडी झालेली आहे. तर वडखोल येथे सागर गावडे घरापर्यंत रस्ताच्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी ४५ लाख रुपये निधी प्राप्त असून सदर काम सुरु झाले आहे.श्री. केसरकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतील वेंगुर्ले भटवाडी येथे साकारलेल्या विहिरीचे व पाण्याच्या टाकीच्या कामाचे तसेच निशान तलाव धरण उंची वाढविण्याच्या कामांचे लोकार्पण अलिकडेच झाले आहे. त्यामुळे शहरातील उन्हाळी पाणीटंचाई पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला आहे.

शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी मुख्याधिकारी व प्रशासक यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे वेंगुर्ले न प पुरस्कार- सचिन वालावलकर
गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत वेंगुर्ले नगरपरीषदेवर कौन्सिल बॉडी कार्यरत नाही तर प्रशासनाकाचा कारभार असल्याने वेंगुर्लेच्या विकासाकडे लक्ष असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या भागाचा आमदार व लोकप्रतिनीधी म्हणून प्रशासक सावंतवाडी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी शहर सौदर्यीकरण स्पर्धेबाबत केलेल्या सुचनांमुळे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांमुळे सौदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ले नगरपरीषद अव्वल ठरली असून श्री. केसरकर यांचेही त्यात योगदान आहे. त्यांच्या निधीमुळे वेंगुर्ले नगरात झालेली आणि होत असलेली पर्यटन पुरक विकास कामे वेंगुर्ले शहरांस गतवैभव प्राप्त होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

शहरातील स्वच्छतेसाठी दोन टेनलेस्टील टायलेट श्री. केसरकर यांच्या प्रयत्नातून २५ लाखाच्या निधीतून कँम्प स्टेडियम व मानसी गार्डन येथे ती त बसविण्यात आली आहेत. तसेच २० लाख रुपयांच्या निधीतून कचरा गोळा 5 करणाऱ्या चारचाकी २ आटो टीपर व १० लाख रुपयांच्या निधीतून दोन टॅक्टर नगर परीषदेस प्राप्त झालेले आहेत. अशी माहिती शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी पत्रकार परीषदेत दिली.

photo –  सचिन वालावलकर,  उमेश येरम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here