वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात रविवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून रविवारी व सोमवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर सोमवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-थकबाकीदारांच्या-मालमत्/
कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रविवारी सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या, पोफळीच्या होळी नाचवत नाचवत मांडावर आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ला शहरात रविवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले याठिकाणी होळी घालण्यात आली. तर मंगळवारी सकाळी कुबलवाडा तसेच सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा याठिकाणी होळी घालण्यात आली. या उत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.
फोटोओळी – वेंगुर्ला येथे होळी नाचविताना नागरीक.