दापोली- दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील शिक्षण कला क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण समारंभात चंद्रनगर गावातील विद्यार्थ्यांसाठीचे विविध पुरस्कार जाहीर केले असून याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरित करून गौरविण्यात आले. चंद्रनगर शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. वेदिका सुभाष मुलूख हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-केसरी-धनगरवाडीत-कमी-दाबा/
चंद्रनगर येथील शिक्षण कला क्रीडा ही संस्था दरवर्षी मे महिन्यात वार्षिक समारंभाच्या निमित्ताने बालक-पालक-शिक्षक आनंद मेळाव्याचे आयोजन करते. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी संस्थेने चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, निबंध, स्मरणशक्ती, संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते आकर्षक व शालोपयोगी बक्षिसे देण्यात आली.
याशिवाय शाळेतील आदर्श विद्यार्थी म्हणून कु. वेदिका सुभाष मुलूख, गुणवंत विद्यार्थी म्हणून कु. पुर्वा सचिन जगदाळे तर गरीब व होतकरु विद्यार्थी म्हणून कु. वैष्णवी वसंत आंबेलकर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वांना मान्यवर व्यक्तिंच्या हस्ते गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभासाठी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, उपाध्यक्ष शैलेश मुलूख, सचिव स्वरुप मुलूख, सल्लागार विजय मुलूख, सुनील रांगले,चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर आदी मान्यव