Kokan: वेळेत बसेस सोडत नसल्याने कवठी चेंदवण वालावल येथील विद्यार्थींचा उपोषणाचा ईशारा

0
100
वेळेत बसेस सोडत नसल्याने कवठी चेंदवण वालावल येथील विद्यार्थींचा उपोषणाचा ईशारा
वेळेत बसेस सोडत नसल्याने कवठी चेंदवण वालावल येथील विद्यार्थींचा उपोषणाचा ईशारा

कुडाळ- कुडाळ बस डेपोची दुपारी १.१५ वा.सुटणारी बस नियोजित वेळ पेक्षा सुमारे दीड ते दोन तास उशीराने सोडण्यात येत असल्याने कवठी चेंदवण वालावल येथील विद्यार्थींचा उपोषणाचा ईशारा. – -कुडाळ बसस्थानकातून सुटणारी दुपारची १.३० वा.ची कवठी बस गेले महीनाभर नियोजीत वेळेपेक्षा एक ते दीड तास लेट सोडली जात आहे या विषयी विचारणा केली असता गाड्या शिल्लक नाही.चालक हजर नाही तर कधी वाहक आलेला नसल्याची कारण सांगून वेळ मारून नेत असल्याने कवठी चेंदवण वालावल गावातील विद्यार्थींना उपाशीपोटी बस स्थानकात पुरेशी बसायला ही जागा नसल्याने ताटकळत उभे राहवे लागते. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-नगरपंचायतीच्या-उप/

बस नियोजित वेळेत सोडावी या संर्दभात कुडाळ डेपोला वारंवार विनंती अर्ज देवूनही बस नियोजीत वेळेत न सोडता कधी कधी रद्द करण्यात येत असल्याने विद्यार्थीना मानसिक व शाररिक त्रास सहन करावा लागत असल्याने कुडाळ डेपोच्या आवारात उपोषण करू असा ईशारा शालेय विद्यार्थांनी लेखी निवेदनातून कुडाळ आगार प्रमुख व्यावस्थापकांना निवेदनातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here