Kokan: शनिवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस कायम

0
24
मुसळधार पाऊस,
शनिवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस कायम

सिंधुदुर्ग-अभिमन्यू वेंगुर्लेकर

नैऋत्य मान्सून दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर सक्रीय झाला आहे. आज (दि.८ जुलै) पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात शनिवार १३ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-श्री-विठ्ठल-मंदिरा/

हवामान विभागाने आज दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवार ९ जुलै ते शनिवार १३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचबरोबर गोवा आणि कर्नाटक किनारी प्रदेशात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज (दि.९ जुलै) गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

देशातील बहुतांशी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. उप-हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशात ९,१० आणि ११ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. तर पुढील ५ दिवसांत मध्य भारत, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here