निकेत पावसकर यांजकडून
सिंधुदुर्ग (तळेरे), दि. 23 :
‘युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन!’ असे गौरवोद्गार भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शनिवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ‘शिक्षक स्नेह मेळावा’ संपन्न झाला, यावेळी आ. दरेकर बोलत होते.https://sindhudurgsamachar.in/दाना-चक्रीवादळ-25-ऑक्टोबरल/
छायाचित्र :
मुंबई : येथील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षक मेळाव्यात विविध गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठी, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, टिजेसबी बँकेचे डिजीएम राजीव मिश्रा, लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, क्षितीज सातधरे, मुंबई शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर, सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. गजानन रत्नपारखी, दाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे , २०० शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांसह विविध दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दोन हजारहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, सिंधुदुर्ग सुपुत्र विशाल कडणे होते. या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंधस्पर्धा, टीचर ऑफ द इअर, प्रिन्सिपल ऑफ द इअर आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शिक्षकांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. वर्ष २०२३ साली उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान मेळाव्यात करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक आदी विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.
स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे, आदी लोकोपयोगी या वृत्तींचा प्रचार करणाऱ्या आजीबाई जोरात नाटकाच्या टीमने शिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी या नाटकाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेते जयवंत वाडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे यांनी केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे मीडिया पार्टनर आहेत.
खूप आनंददायी क्षण होता. १ हजार, २०० शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांचे गोड कौतुक करण्याची संधी मिळाली. यासाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. खूप भव्य-दिव्य आणि ग्लॅमरस कार्यक्रम झाला. शिक्षक हा आपल्या व्यवस्थेचा कणा आहे. अशा आदरणीय शिक्षकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या विरंगुळ्यासाठी काही क्षण निर्माण करणे, हे मला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’मुळे शक्य झाले. यासाठी मला किरण शेलार, आ. निरंजन डावखरे आणि आ. प्रविण दरेकर या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले यासाठी खूप आभार.
– विशाल कडणे, अध्यक्ष, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
हा म्हणजे पुरस्कार मिळणे हा शिक्षकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल पुरस्कार देऊन सन्मानित केले, त्याबद्दल आभार मानतो. हा पुरस्कार माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा आणि माझ्या पालकांचा आणि शिक्षकांचा आहे. पण, त्याहून जास्त विद्यार्थ्यांचा आहे. कारण विद्यार्थी शाळेची ओळख दाखवतात. शिक्षक आपले कर्तव्य करतच असतात. पण, घडवलेले कुठे जाते? तर ते ज्या वेळेला बाजारात जातात, आपली प्रसिद्धी, प्रगती आणि किंमत तिथे दाखवत असतात. शिक्षकाशिवाय पुढे जाता येणार नाही. सगळ्या शिक्षकांना पुरस्कार मिळतात, त्याबद्दल मी या संस्थेचा सदैव ऋणी राहील.
– मारुती म्हात्रे, जीवन गौरव पुरस्कारार्थी
दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बहुमुखी कार्यक्रम करणारे माझे मित्र विशाल कडणे, त्यांचे कुटुंब आणि इथे उपस्थित त्यांच्या मित्रपरिवार, कार्यकर्ते यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी इतका चांगला आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थितांसह कार्यक्रम केला. विशाल एक हाडाचा शिक्षक आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगला शिकवतो. एक चांगले विद्यार्थ्यांचे फॉलोईंग विशाल सरांच्या मागे आहे. सोल्युशन ओरिएंटेड विचार करणारा शिक्षक किंवा तशा प्रकारचा संशोधन करणारा शिक्षक आज आवश्यक आहे. कारण एक गॅप आपण मोठ्या प्रमाणावर आता पाहतो. आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचा तो म्हणजे बदलता काळ, त्या बदलत्या काळानुसार निर्माण होणारे रोजगार, रोजगारातील संधी आणि आपलं शिक्षण, आपल्या शिक्षकांनी जर चंग बांधला की, आपण जे काही शिकवतोय ते आपण इतक्या उत्तम प्रकारे शिकू की, आपल्या विद्यार्थ्यांला रोजगाराच्या संधी शोधाव्या लागणार नाहीत, तर रोजगार त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतील. जेणेकरून शिक्षक म्हणून सुद्धा आपण लोकप्रिय ठरू आणि विद्यार्थी प्रिय ठरू. दिवसाचे शेवटी आपल्या मनाला एक समाधान राहील.
– किरण शेलार, संपादक, मुंबई तरुण भारत
दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था समाजकार्यात उल्लेखनिय योगदान देते आहे. राजा आणि शिक्षक यांच्यात सर्वात महान कोण, असेल तर तो शिक्षक आहे. आज अशा महान शिक्षकांच्या सन्मानाचा हा सोहळा होत आहे. अशा शिक्षकांचा सन्मान हा सर्वच स्थानांवर झाला पाहिजे. ठाणे, मुंबई किंवा महाराष्ट्र कोणतेही स्थान असो शिक्षकांचा सन्मान करूया. इथे उपस्थित सर्व शिक्षकांचे अभिनंदन.
– पवन त्रिपाठी, खजिनदार, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करते. त्यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन करतो. उत्तमरित्या आयोजित केलेल्या या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो.
– निरंजन डावखरे, आमदार
एका विद्यार्थ्यांने आपला ‘जीवन गौरव’ देत सन्मान करावा म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी कसा घडावा? विद्यार्थी कसा असावा? याचे हे उदाहरण आहे. माझी संपूर्ण शाळा माझी संस्था आणि सर्व शिक्षक हे विशालच्या पाठीशी कायम उभे असतील. हे त्याचे कार्य असे पुढे उत्तरोत्तर वाढू दे, अशा त्याला शुभेच्छा देते.
- वर्षा सावंत, जीवन गौरव, पुरस्कारार्थी