🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /शिरगाव/प्रतिनिधी- पांडुशेट साठम
सातारा येथे २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान पार पडत असलेल्या कोल्हापूर विभागीय स्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत शालेय खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत यशाचे शिखर गाठण्याचे ध्येय ठेवले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-चिपी-ते-मुंब/
आजच्या पहिल्या दिवसाच्या स्पर्धेत, १७ वर्षाखालील मुलींच्या गटात ४५ किलो वजनी गटातील माया महेश निकम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून आपली विजयी मोहोर उमटवली. तिच्या अथक परिश्रमांचे आणि समर्पणाचे हे फळ आहे. तिच्या या यशासाठी तिला मार्गदर्शन करणारे श्री. प्रवीण शेट्ये आणि श्री. ए. एम. गर्जे सर यांचे विशेष अभिनंदन आहे.
अजून दोन दिवस स्पर्धा सुरू असून, शिरगाव हायस्कूलच्या इतर विद्यार्थ्यांनाही या यशाच्या परंपरेत सहभागी होण्यासाठी संधी आहे. स्पर्धेतील पुढील कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.पुन्हा एकदा सहभागी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळे तर्फे व संस्थे तर्फे अभिनंदन केले आहे.