Kokan: शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

0
41
राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ला/ प्रतिनिधी-
जन्माला येऊन सात महिने झालेल्या नुतन बालकाला यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. परंतु, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलाचे प्राण वाचणे कठीण झाले होते. दरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून आर्थिक सहकार्य करण्याची हमी दिल्याने त्या नुतन बालकाचे प्राण वाचणार आहेत. या लहान बालकाचे प्राण वाचविण्याकामी मुख्यमंत्री धावून आल्याने बालकाच्या नातेवाईकांनी त्यांचे ऋण व्यक्त केले आह https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

शिरोडा-परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत पत्यारोपण अत्यावश्यक आहे. यासाठी रूग्णालयाने सुमारे दहा लाख एवढ्या खर्चाचे पत्रक गौरांगच्या पालकांना दिले. आर्थिक परिस्थिती नसलेल्या गौरांगच्या पालकांनी आणि प्रभाकर परब यांनी विविध माध्यमांमधून समाजातील संवेदनशील व्यक्तींना आवाहन केले. ही बाब भाजप वैद्यकीय आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक डॉ.अमेय देसाई यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासोबत संपर्क साधत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात लक्ष घातले तर गौरांगला जीवदान मिळू शकेल असे सुचित केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-हेमंत-सावंत-यांना-राष्ट्/

यावर तात्काळ त्यासंबंधीचे विनंती पत्र मुख्यमंत्री यांना देण्यात आले आणि त्यावर लागलीज कार्यवाही करण्याचे आदेशही राज्याचे नवनिर्वाचित पण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. एकार्थाने संवेदनशील लोकप्रतिनिधी आणि राज्याचे प्रमुख असले की, सामान्य माणसाच्या आयुष्यात गुणात्मक परिवर्तन कसे घडू शकते याचा परिपाठच आमदार भारतीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी घालून दिला आहे.

कु. गौरांग याला यकृत प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून सहाकार्य केले जाणार आहे. त्यामुळे गौरांगच्या प्रकृतीची काळजी मिटली आहे. याबाबत त्याच्या पालकांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, डॉ.अमेय देसाई यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here