Kokan: शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते खा. संजय राऊत शुक्रवार पासून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर

0
77
संजय राऊत

संजय राऊत काय बोलणार याकडे रत्नागिरी,सिंधुदुर्ग वासियांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई -शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल होतील. दुपारी १२ वा. रत्नागिरी येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी ०३ वा. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.

शुक्रवारी सायंकाळी ०६ वा.कणकवली येथे त्यांचे आगमन होणार आहे.याप्रसंगी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. कणकवली विजय भवन येथे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. अशी माहिती शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या या दौऱ्यात ते नेमके काय बोलणार याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग वासियांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here