सुनिता भाईप/ सावंतवाडी-
१४ वा वित्त आयोग निधीत कदमवाडी शिवापूर पायवाट व गटार बांधणे या कामाची मंजुरी घेण्यात आली यामध्ये संपूर्ण पायवाट ९० मीटर त्यामधिल ३० मीटर गटार अंडरग्राउंड व त्यातील १५ मीटर ला कडप्पा लावने असे संबंधित काम बंद गटार अशा स्वरूपाचे असून सद्यस्थितीत पाहता गटार की पायवाट हा प्रश्न उद्भवतो. ज्या ठिकाणी गटार अपेक्षित आहे त्या ठिकाणी पायवाट केली आहे व कडप्पा ही लावले नाहीत परिणामी यामुळे वाडीतील श्री.तुकाराम कदम,श्री.भागोजी कदम,श्री.यशवंत कदम,श्री.वामन कदम या चार व्यक्तींच्या घरांच्या भिंतींना धोका उद्भवतो यातील काही घरे पक्की नसल्याने मातीची आहेत यांचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण ? ठेकेदार की ग्रामपंचायत हाही प्रश्न उद्भवतो.https://sindhudurgsamachar.in/kokan-इमारत-बांधकाम-कामगार-यां/
या सर्व प्रकरणावर विद्यमान सदस्य संदीप कदम यांनी आक्षेप घेतला आहे.कामाचे स्वरूप पायवाट व बंद गटार असे आहे याच्यावर कडप्पा वगैरे काही न लावता पंचायत समिती शिओ नि याला मंजुरी देऊन हे काम पूर्ण झाले आहे असेही नमूद केले आहे.संबंधित ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वात काम करत असून काही ठराविक व्यक्तींना विश्वासात घेऊन कामे दिली जातात तसेच या कामासंदर्भात विद्यमान सदस्य संदीप कदम यांना विश्वासात न घेता सरपंच व ग्रामसेवक या संबंधित व्यक्तींना वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे कुंपणच शेत खाते की काय अशा पद्धतीच्या गोष्टी या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामांच्या बाबतीत सतत घडत असताना दिसून येतात
सदरील काम ठेकेदार राधास्वामी कंट्रक्शन च्या माध्यमातून सुभाष रामचंद्र सावंत यांनी ग्रामपंचायत सरपंच सुनीता सुरेश शेगडे तसेच ग्रामसेवक संदीप सावंत यांना विश्वासात घेऊन हे काम घेतले असून या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत आहे परंतु विद्यमान सदस्य संदीप कदम यांचा आवाज दाबला जातो हेही तितकच खरं आहे संबंधित कामाची पूर्तता न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.