वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-देऊळवाडा, सातेरी मंदिर नजिकचा रहिवासी शुभम श्रीधर धारगळकर याने किग एडवर्ड मेमोरीअल हॉस्पिटल आणि शेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, मुंबई मधून वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस‘ ही पदवी संपादन केली आहे. https://sindhudurgsamachar.in/महिंद्रा-एरोस्ट्रक्चर्स/
शुभम याने प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला नं.४ येथे, माध्यमिक शिक्षण वेंगुर्ला हायस्कूलमध्ये तर उच्चमाध्यमिक शिक्षण एस.पी.के.सावंतवाडी येथे पूर्ण केले. दहावी परिक्षेत त्याने वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. नंतर त्याने वैद्यकीय क्षेत्राची निवड करीत किग एडवर्ड मेमोरीअल हॉस्पिटल आणि शेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, मुंबई मधून ‘एमबीबीएस‘ ही पदवी संपादन केली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. यापुढेही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीचा अभ्यास करण्याचा मानस असल्याचे त्याने सांगितले. शुभम हा सिधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी श्रीधर धारगळकर यांचा मुलगा होय.
फोटो – शुभम धारगळकर